- चाकण शिक्रापूर महामार्गावर भिषण अपघात….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मे २०२५) :- शिक्रापूरकडून चाकणकडे येणाऱ्या आयसर ट्रक चालकाने त्याची लेन बदलून विरुद्ध दिशेला येऊन शिक्रापूर बाजुकडे थांबलेल्या महिंद्रा जिपला धडक दिली. दरम्यान ढाब्यामधुन भाकरी आणण्यासाठी जात असताना जीपच्या बाजूस थांबलेला राहुल संतोष कोळी, फिर्यादी व फिर्यादीचा मित्र रोहित सत्यवान जाधव या तिघांपैकी त्यात फिर्यादी व राहूल संतोष कोळी यांना गंभीर जखमी केले. त्यांचा मित्र रोहित सत्यवान जाधव याच्या मरणास आरोपी वाहनचालक कारणीभूत झाला आहे.
ही घटना (दि.०४) रात्री ०९.३० वाजेच्या दरम्यान चौधरी ढाब्याच्या पुढे, विशाल गार्डनचे बाजुला, शिक्रापुर -चाकण रोडवर, चाकण येथे घडली. याप्रकरणी सत्यम कोते (वय २१ वर्षे, राहणार चाकण) याने आरोपी रामराव सौदाजी नांगरे (वय ५९ वर्षे राहणार सणसवाडी, तालुका शिरूर जिल्हा पुणे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून चाकण पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.











