न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मे २०२५) :- रावेत येथे इनोव्हा गाडीच्या काचेवर दगड मारून गाडीची काच फोडली. गाडी ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने पेटवुन देत फिर्यादीची ७,०००००/- रु की ची इनोव्हा गाडी व त्यामध्ये १५,०००/रूपये रोख रक्कम जाळून नुकसान केले आहे.
हा प्रकार (दि.०५) रोजी पहाटे ०४:०० ते ०४.३० वा गणेश सृष्टी बिल्डींग जवळ श्रदधा डायग्नोस्टीक समोरील रोडचे बाजूला घडला. याप्रकरणी राघू पांडूरंग गव्हाळे वय २७ वर्षे, व्यवसाय- ड्रायव्हर यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. रावेत पोलीसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.











