न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२५) :- नागरिकांना विविध कामांसाठी पीएमआरडीए कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. त्यासाठी प्रशासकीय कामाचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने चार प्रादेशिक आणि नऊ तालुकास्तरीय कार्यालये सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली होती. १ मेच्या अनुषंगाने ते कार्यालय सुरू करण्यात येणार होती. प्रत्यक्षात केवळ ३ कार्यालय सुरू करण्यात आली आहेत.
प्राधिकरणात ६९७ गावांचा समावेश होतो. याअंतर्गत मेट्रो, पुणे आंतरराष्ट्रीय प्रर्दशन केंद्र, रिंगरोड, नगररचना योजना, नदी सुधार प्रकल्प, मेडिसिटी, पाणीपुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना, गृहयोजना अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. बांधकाम परवानगी, झोन दाखले, गुंठेवारी, टीडीआर, अग्निशमन विभागातील दाखले, अतिक्रमण तक्रारी, रस्ते, पाणीपुरवठा इत्यादीसाठी नागरिकांना प्राधिकरण कार्यालयात यावे लागते. सामान्यांचा त्रास कमी करण्यासाठी ही कार्यालय सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पीएमआरडीएने ३ कार्यालय सुरू केली आहेत. त्यापैकी एक कार्यालय हे औध येथील कार्यालयात उभारण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळही देण्यात आले आहे. मावळ, मुळशी, खेड या ठिकाणी कार्यालयासाठी जागेचा शोध सुरू आहे, अशी माहिती प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे.
प्राधिकरण, आकुर्डी मुख्य व औध कार्यालय येथे येण्यासाठी तसेच प्राधिकरण क्षेत्रातील दौड, शिरूर, खेड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी या तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातील सामान्य जनतेस मुख्य कार्यालय येथे येण्यासाठी अडीच तीन तास इतका कालावधी लागतो. त्यामुळे विस्तीर्ण अशा पुणे महानगर प्रदेशात ४ प्रादेशिक आणि ९ तालुका कार्यालये नागरिकांच्या सोयीसाठी स्थापन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सरू होती.