न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १८ मे २०२५) :- सावकारकीचा वैध परवाना नसताना ३,४०,००० रुपये ०२ रुपये दरमहा दर शेकडा व्याजाने सावकाराने एकाला दिले. त्याबदल्यात व्याज व मुददलसह एकुण ५,६७,०००/- रुपये तरुणाकडून घेतले. असे असतांना सावकाराने तरुणाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
टेम्पो व दुचाकी गाडी ही वाहने जबरदस्तीने ठेवून घेतली. पैसे दिले तरच गाड्या परत दिल्या जातील, नाहीतर गाड्या विसरुन जा, असे म्हणत तरुणाची फसवणूक केली आहे. हा प्रकार (दि. १५/१०/२०२४ ते दि.१६/०५/२०२५) दरम्यान वाकी खुर्द ता. खेड जि. पुणे येथे घडला.
फिर्यादी श्रीकांत वहीले याने आरोपी महेश कुंदन परदेशी (रा. वाकी ता. खेड जि. पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली असून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















