- दररोज होतोय १४ तास पाणीपुरवठा?..
- पाणी गळती थांबल्याचा पालिकेचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२५) :- स्मार्ट सिटी असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २४ बाय ७ योजनेचे ४० टक्के भागाचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेंतर्गत निगडी प्राधिकरणात सेक्टर २४, २५ आणि २६ भागासाठी सर्व नागरिकांना पुरेशा दाबाने समान पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे. दररोज १४ तास पाणीपुरवठा सुरू ठेवल्याने पाण्याची गळती पूर्णपणे थांबली असून, दूषित पाण्यापासून नागरिकांना होणाऱ्या आजारातून सुटका झाली आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून २४ बाय ७ योजनेतून निगडीत प्रायोगिक तत्त्वावर १ जानेवारी २०२४ मध्ये सेक्टर २४, २५, २६ मध्ये दररोज १४ तास पाणी दिले जात आहे. त्यानंतर सेक्टर २७ व २८ परिसरात जूननंतर पाणी दिले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात निगडी प्राधिकरण, चिंचवड, थेरगावचा दत्तनगर, सांगवी, बो-हाडेवाडी (मोशी), दिघी गावठाण, भोसरी, मगर स्टेडियम, अजमेरा, यमुनानगर, संभाजीनगर, या भागात कामे पूर्ण झाली आहेत. पूर्वी या भागात दररोज ५ एमएलडी पाणी द्यावे लागत होते. ते ३ एमएलडीवर आले आहे. त्यामुळे या भागातील गळती व चोरी रोखण्यात यश आले आहे.
२४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेतून पहिल्या टप्प्यात निगडी प्राधिकरण, चिंचवड, थेरगावचा दत्तनगर, सांगवी, बो-हाडेवाडी (मोशी), दिघी गावठाण, भोसरी, मगर स्टेडियम, अजमेरा, यमुनानगर, संभाजीनगर, शाहूनगर या भागात कामे पूर्ण झाली आहेत. संबंधित भाग हा दाट लोकवस्तीचा असून या भागात पाण्याच्या तक्रारी अधिक होत्या. २४ तास पाणीपुरवठा योजनेचे कामावर सुमारे १५५ कोटी खर्च केले आहेत.
२४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या चाळीस टक्के भागाचे काम पूर्ण झाले आहे. प्रायोगिक तत्वावर निगडी प्राधिकरणात दररोज १४ तास पाणीपुरवठा सुरू आहे. सर्व नागरिकांना पुरेशा दाबाने समान पाणीपुरवठा होत असला, तरीही नागरिकांचे आरोग्य सुधारणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
– राजेंद्र मोरावणकर, उपअभियंता, निगडी…

















