न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२५) :- पिंपरी येथील दिवाणी न्यायालयातील मुख्य न्यायाधीश एन.आर. गजभिये यांची पदोन्नती तसेच न्यायाधीश एम.जी. मोरे यांची बदली झाली आहे. या दोन्ही न्यायाधीशांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड अॅड असोसिएशनच्या वतीने सत्कार सोहळा आणि निरोप समारंभाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम न्यायालयातील वकील पुरुष कक्ष येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी पिंपरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील न्यायाधीश एस.एन. गवळी, ए. के. अल अमोदी, व्ही. एन. गायकवाड साहेब, महिला न्यायाधीश एस एस चव्हाण आणि पी डी पाटील उपस्थित होते. यावेळी मुख्य न्यायाधीश गजभिये आणि मोरे यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड अॅड. असोशिएशनचे अध्यक्ष पांडुरंग शिनगारे, उपाध्यक्ष अॅड. अजय यादव, सचिव अॅड. संदीप तापकीर, महिला सचिव अॅड. संगीता कुशलकर, सहसचिव अॅड. पद्मावती पाटील, खजिनदार अॅड. विशाल पोळ, हिशोब तपासणीस अॅड. प्रेरणा चंदानी, सदस्य अॅड. सुषमा पाटील, अॅड. आरती कुलकर्णी, अॅड. पोर्णिमा मोहिते, अॅड. रूपाली पवार, अॅड. अक्षय चौधरी, अॅड. विजय भोंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील विकास संघाचे विद्यमान अध्यक्ष अॅड. अरुण खरात तर प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ उपस्थित होते.
यावेळी अॅड. बी. के. कांबळे, अॅड. देविदास शिंदे, अॅड. संतोष काशिद, अॅड. प्रमिला गाडे, अॅड. सुनील कडूसकर अॅड. नितीन कांबळे, अॅड. समीर चव्हाण, अॅड. तेजस चवरे, अॅड. . राजेश रणपिसे, अॅड. विजय रोडे, अॅड. सयाजी साळुंखे, अॅड. नागेश गर्जे, अॅड. बाजीराव दळवी, अॅड. . ऋषी मगर, अॅड. प्रकाश नेनाळे, अॅड. हर्ष गोधवानी, अॅड. तुषार खरात, अॅड. विशाल गभाले, अॅड. नारायण थोरात, अॅड. एम. एस. जाधव, अॅड. धीरज कुचेरिया, अॅड. चंद्रकांत माने, अॅड. नवनाथ कुटे, अॅड. सूर्यकांत कोंडे-देशमुख, अॅड. धीरज पवार, अॅड. प्रणव नवले, अॅड. ओमकार नानेकर, अॅड. संजय जाधव, अॅड. जयेश वाकचौरे, अॅड. प्रकाश नेवाळे, अॅड. विजय वाघोदे, अॅड. दत्तात्रेय भोंडे, अॅड. अमोल उचाळे,अॅड. स्नेहा कांबळे, अॅड. कांता गोरडे, अॅड. शीला दळवी, अॅड. धनश्री कांबळे, अॅड. प्राजक्ता कदम, अॅड. सुलभा खामकर, अॅड. पल्लवी कुन्हाडे, अॅड. प्रिया रसाळ तसेच बहुसंख्य वकील बंधू भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव अॅड. संदीप तापकीर, सदस्य अॅड. सुषमा पाटील यांनी केले. तर आभार महिला सचिव अॅड. संगीता कुशलकर यांनी केले.











