न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २४ मे २०२५) :- गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या दोघांनी विक्री करीता जवळ बाळगला. पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी कारवाई करीत दोघांना जेरबंद केले आहे.
ही कारवाई अनुक्रमे भोसरी आणि चिखली पोलीसांनी (दि. २२) रोजी रात्री साडेसातच्या सुमारास लांडगे नाट्यगृहजवळ भोसरी येथील मोकळया जागेमध्ये आणि जाधववाडी, चिखली येथील बैलगाडा घाट, पाण्याच्या टाकीजवळ केली. कारवाईत एकूण 72900 रूपयांचा 1455 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्याचे सहा पोलीस फौजदार विश्वनाथ बोयणे आणि चिखली पोलीस ठाण्याचे खंडणी विरोधी पथकाचे गुन्हे शाखेचे पोलीस हवा भुपेंद्र खंडू चौधरी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सनी बबन शिंदे (वय-२९ वर्षे, रा. दिघी) आणि अभिजीत लहू तुरुकमारे (वय-२४ वर्षे रा. जाधववाडी, चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.