न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २४ मे २०२५) :- फ्लॅटवर आरोपीने कर्ज घेतले होते. सदरचे कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे फिर्यादी यांनी सदर फ्लॅटचा कायदेशिर प्रक्रियेने अपर तहसिलदार, पिंपरी चिंचवड, दोन पंचा समक्ष पोलीस संरक्षणात ताबा घेऊन फ्लॅट जप्त करुन सिल केला होता.
दरम्यान सदरचे सिल तोडुन तसेच नोटीस फाडुन आरोपीने अनधिकृतरित्या प्रवेश करुन फ्लॅटचा ताबा घेतला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
शाहुनगर, एम.आय.डी.सी. चिंचवड येथे हा प्रकार घडला आहे. महिला फिर्यादी (लिगल एक्झीक्युटिव्ह) मुंबई यांनी आरोपी जालींदर कदम यांच्या विरोधात फिर्याद दिली असून निगडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















