न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शिरगाव (दि. २४ मे २०२५) :- पतीची वडीलोपार्जीत मिळकत सामाईक जागेत गेली असता जून्या जमिनीच्या वादातून फिर्यादी महिलेचे दिर आरोपी क्र. १ व २ यांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली.
तसेच आरोपी क्र. ३ हीने फिर्यादीचे केस पकडून जमिनीवर खाली पाडून हाताने लाथा बुक्यांनी मारहाण केली तसेच मोठे दिर आरोपी क्र.४. यांनी देखील महिलेला हाताने मारहाण करून ‘काय व्हायचे ते एकदाच होऊ दे हीला चांगली ठोका’ असे बोलून शिवीगाळ केली, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २१) रोजी ४.०० वा. चे सुमारास गट नं. ८२ मौजे उर्से, ता. मावळ येथे घडला. याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी आरोपी १. संतोष तुकाराम रसाळ (दिर) वय ४० वर्षे, २. महिला आरोपी (जाऊ) वय ३५ वर्षे, ३. महिला आरोपी (जाऊ) वय ४२ वर्षे, ४. मारूती तुकाराम रसाळ (मोठा दिर) वय ४५ वर्षे सर्व रा. उर्से, ता. मावळ यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलीसांनी आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















