न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहा पोलिस निरीक्षक, नऊ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३२ पोलिस उपनिरीक्षक अशा ४७ अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे अपर पोलिस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी मंगळवारी तसे आदेश दिले.
वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांची ठाणे शहर येथे बदली झाली. पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांची गुन्हे अन्वेषण विभाग, विश्वजित खुळे यांची तुरचीतील पोलिस प्रशिक्षण केंद्र, देवेंद्र चव्हाण यांची खंडाळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर आणि सुनील पिंजण यांना एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.
पोलिस निरीक्षक महेश पाटील (मुंबई शहर), दत्तात्रय चासकर (राज्य पोलिस नियंत्रण कक्ष, मुंबई), राहुल सोनवणे (वर्धा), राजेंद्र पाटील (सिंधुदुर्ग), जगन्नाथ जानकर (नाशिक शहर), नरेंद्र ठाकरे (बुलढाणा), विजयानंद पाटील (पुणे शहर), संजय नराताड (पुणे शहर), संजय सोळंके (यवतमाळ), दौलत जाधव (अहिल्यानगर), सुदाम पाचोरकर (एसीबी), महादेव कोळी (मुंबई शहर) यांची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात बदली झाली आहे.
नऊ सहायक पोलिस निरीक्षकांची बदली झाली. सहायक निरीक्षक रत्नमाला सावंत, श्रीराम शिंदे यांच्यासह २२ सहायक निरीक्षक शहरात आले आहेत. चर्चेत असलेले पोलिस उपनिरीक्षक मीलन कुरकुटे तसेच सोशल मीडियावरील एका गेममध्ये करोडपती झालेले सोमनाथ झेंडे यांच्यासह ३२ उपनिरीक्षकांची बदली झाली आहे.

















