न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२५) :- देहुगाव येथील इंडसइंड बँकचे एटीएम ज्वलनशील गॅस, लायटर, कटर, तोंडावर मारण्याचा स्प्रे, तसेच दगड घेऊन फोडुन दरोडा टाकला. दरम्यान पोलीस फिर्यादी व इतर पोलीस स्टाफ बिटमध्ये गस्त करत असताना त्यांच्यावर हमला करुन त्यांना मारहाण केली.
हा प्रकार (दि. २७) पहाटे ०१/५० वा.चे सुमारास देहुगाव येथील देहुगाव- आळंदी रोडवरील इंडसइंड बँकेचे एटीएम येथे घडला. याप्रकरणी समाधान विष्णु पटावकर पोलिस शिपाई यांनी आरोपी १. मुस्तफा मोबीन खान वय-३० वर्षे रा. पिनागव्वान ता. पुन्हाना जि. नुह राज्य हरियाणा, २. मुस्तकीम मोबीन खान, वय-२५ वर्षे रा. पिनागव्वान ता. पुन्हाना जि. नुह राज्य हरियाणा, ३. महिला आरोपी, ४. वारीस खान अंदाजे वय-२० वर्षे रा. पिनागव्वान ता. पुन्हाना जि. नुह राज्य हरियाणा, ५. आझाद खान अंदाजे वय-४५ वर्षे रा. पिनागव्वान ता. पुन्हाना जि. नुह राज्य हरियाणा यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलीसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी क्र १ व २ यांना अटक केली आहे.












