न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२५) :- “तु या दस्ताला ओळख का दाखवलीस” असे म्हणुन शिवीगाळी करुन हाताने मारहाण केली. तरूण व त्याचा मित्र नखाते यास तोडतोच अशी धमकी देत आरोपी निघुन गेला, असं फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीचा मित्र नखाते याने रहाटणी येथील जमीन खरेदी करताना खरेदी दस्तामध्ये ओळख दाखविल्याच्या कारणावरुन हा प्रकार भालेराव कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रहाटणी येथे घडला. आकाश भालेराव याने आरोपी किरण देवराम नखाते वय ४५ वर्षे रा. रहाटणी याच्या विरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काळेवाडी पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.












