न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२५) :- टोळक्याने तलवारीने केक कापल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला. परीसरातील नागरीकांवर दहशत माजवली. तसेच आरोपी क्रं १ याने एक लोखंडी तलवार स्वत:चे ताब्यात बाळगुन पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या हत्यारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.
सायंकाळी (दि. 26) बंद पडलेल्या बिल्डींगमध्ये, पाण्याचे टाकीजवळ आळंदी देवाची येथे ही घटना उघडकीस आली.
प्रदिप गोंडाबे, पोलीस हवा ब. नं. ८८१, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी आरोपी १) राकेश विजय सोळंकी, वय २१ वर्षे, रा. गजानन महाराज मंदिराजवळ, आळंदी देवाची, २) अभिषेक बाजीराव नागरगोजे, वय २० वर्षे, रा. देहुफाट्याजवळ, आळंदी देवाची, ३) विश्वजित निळकंठ अंभोरे (वय १९ वर्षे, रा. गजानन महाराज मंदिराजवळ, आळंदी देवाची) , ४) ऋषिकेश हरिश्चंद्र दुनघव, वय १९ वर्षे, रा. आळंदी देवाची, ५) तीन अनोळखी इसम (रा देहुफाटा आळंदी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप मोकाट आहेत.












