न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २८ मे २०२५) :- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे या प्रकरणानंतर काही दिवस फरार होते. तेव्हा त्यांना मदत केलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या या पाच जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे याला आसरा देणाऱ्या पाच जणांना पुणे न्यायालयाने काल (मंगळवारी) न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यामध्ये माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील (कर्नाटक) यांचा मुलगा प्रीतम पाटील, मावळ मधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक, साताऱ्यातील पुसे गाव येथील राहुल जाधव,अमोल जाधव,तळेगांव दाभाडे येथील मोहन भेगडे यांच्या यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली होती. या सर्वांचा आता 25 हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन झाला आहे
या दरम्यान त्यांनी पुणे सातारा कर्नाटक भागामध्ये वास्तव्य केले असल्याची माहिती समोर आल्यानंतर साताऱ्यातील पुसेगाव या ठिकाणचे राहुल जाधव आणि अमोल जाधव यांना अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांना पुणे न्यायालयासमोर हजर केले असता. पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती त्यांचे वकील अँड. श्रीकांत पन्हाळे यांनी दिली आहे. पुसेगावच्या राहुल जाधव आणि अमोल जाधव यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती.
या प्रकरणांमध्ये जे आरोप केले होते ते हार्बरिंग ऑफ क्रिमिनल अनुषंगाने असल्यामुळे हा जामीन पात्र गुन्हा आहे यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्यामुळे आणि त्यांच्यावर कोणताही पुरावा, आरोप नसल्यामुळे त्यांना जामीन मिळावा, असा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडल्यामुळे हा जामीन मंजूर झाला आहे. पोलिसांच्या तपासामध्ये पुसेगाव येथील राहुल जाधव आणि अमोल जाधव यांनी फरार असणाऱ्या संशयित राजेंद्र हगवणे यांना आश्रय दिला असल्याची माहिती होती. मात्र प्राथमिक दृष्ट्या तरी त्यांचा या प्रकरणाशी संबंध दिसून येत नाही.












