न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२५) :- गेले दोन दिवसांपासून शहर परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत. प्राधिकरणातील म्हाळसाकांत शाळेच्या पुढे आकुर्डी रेल्वे स्थानककडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे झाड उन्मळून पडले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला.
रस्त्यावर सुदैवाने कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, येथे पार्क करण्यात आलेल्या मोटारीवर ते झाड कोसळले. त्यामुळे मोटारीचे नुकसान झाले. अवजड झाड हटवणेदेखील मुश्लिक झाले होते. अखेर पालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करावे लागले.











