न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२५) :- रहाटणीतील श्रीनगर येथील डिवाईन ड्यू सोसायटी ते सुखवाणी आर्या सोसायटी समोरच्या रस्त्याच कॉंक्रीटीकरण करा, अशी मागणी कोकण-खेड युवा शक्तीचे माजी अध्यक्ष रुपेश मोरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रोहित पाम सोसायटी ते छत्रपती चौक हा रस्ता सिमेंटचा झाला. अद्याप आम्हाला आश्वासन मिळूनही रस्ता झाला नाही. येथील डीवाइन ड्यु सोसायटी, हरित शिल्प, तसेच सुखावणी आर्या या तीन सोसायटीतील मिळून ४०० ते ५०० फ्लॅटधारक आहेत. प्रत्येक जण मालमत्ता कर न चुकता भरत आहे. मग आम्हाला सिमेंटचा रस्ता का नाही?
येथील कच्चा रस्ता हा खराब असल्यामुळे येथे दररोज अपघात होत आहेत. तसेच झालेल्या मुसळधार पावसामुळे आजूबाजूला पाणीच पाणी झाले आहे. वाहने कशी चालवायची? रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली गेली आहे. तसेच आजूबाजूला फक्त खडी व डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा काम झालं आहे. पूर्ण रस्ता कधी होणार? रस्ता पावसाळ्यापूर्वी करून द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.











