न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ३१ मे २०२५) :- देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या रिक्तपदावर शुक्रवारी (दि. ३०) दुपारी झालेल्या निवडणुकीत प्रियंका मोरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी जाहीर केले.
प्रियंका मोरे या चार वर्षातील पाचव्या उपनगराध्यक्षा बनल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मयूर शिवशरण यांनी देहूच्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवारी दुपारी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, सहायक अधिकारी नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहिले.











