न्यूज पीसीएमसी नेटवर्क
लोणावळा (दि. ३१ मे २०२५) :- लोणावळ्यातील वलवण धरणाच्या बाजूला पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.झाला. नीलेश शिंदे (१७, रा. कासारवाडी, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नीलेश शिंदे हा आपल्या १२ मित्रांबरोबर लोणावळ्यात फिरायला गेला होता. वलवण धरणाच्या लगत असणाऱ्या भागामध्ये मित्र पोहत होते. त्यावेळी नीलेश शिंदे पाण्यात बुडाला. त्यानंतर त्याला मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शिवदुर्ग मित्र लोणावळा यांना पाचारण करण्यात आले.
शिवदुर्गच्या पथकाने पाणबोटीच्या साहाय्याने मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. काही वेळाने मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. शोधकार्यात वैभव दुर्गे, योगेश दळवी, मयूर दळवी, सागर दळवी, कपिल दळवी, आकाश मोरे, रोहित मोरे, महेश मसने, कुणाल कडू, महादेव भवर, पिंटू मानकर, सतीश मगर, सुनील गायकवाड यांचा समावेश होता.














