न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२५) :- पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘निर्जली’ या आशयसंपन्न चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावत महोत्सवाच्या केंद्रस्थानी स्थान मिळवले, तमिळ भाषेतील ‘थुनाई’ या लघुपटाने साऱ्यांची मने जिंकून सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार आपल्या नावे केला. तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्ममध्ये ‘लेस’ ने बाजी मारली. या महोत्सवात भारतासह ४० देशांमधून आलेले ९० पेक्षा अधिक चित्रपट, लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन आणि ६० सेकंद फिल्म्स प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रियंका भेरिया आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तुषार शिंगाडे यांना प्रदान करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण समारंभ दिमाखात संपन्न झाला. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या या सोहळ्यात देश-विदेशातील कलावंतांना विविध विभागांतील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रत्येक चित्रपटामागची कल्पकता, सामाजिक जाणीव, दिग्दर्शन आणि तांत्रिक कसोट्या अनुभवायला प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
यावेळी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, महापालिका उप आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक सुजय डहाके, रमेश होलबोले, अभिनेत्री राजश्री देशपांडे, मुख्यमंत्री सहाय्यक शुभम सातकर, रयत शिक्षण संस्थेमधील प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटीचे अध्यक्ष दत्ता गुंड, मुंबा फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष जय भोसले, महोत्सव संचालक अभिषेक अवचार, व्यवस्थापकीय संचालक सायली शिंदे, महोत्सव सचिव डॉ. विश्वास शेंबेकर, ज्युरी सदस्य हेमंत अवताडे, महात्मा फुले विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल मासुळकर, सोमनाथ शितोळे, विजय गुंड , प्रियांका चौधरी, माधुरी धमाले, अॅड. धम्मराज साळवे, आकाश माळी, ऐश्वर्या डोरले, इमरान शेख, राम दत्तकला, अविनाश कांबीकर, पालक कौल, श्रुती जाधव, किशोर काळे, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी महोत्सवात नामवंत ज्यूरी मार्फत निवडण्यात आलेल्या विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये व्हिडीओ सॉंग, अॅनिमेशन फिल्म, चित्रपट, लघुपट व माहितीपट व ६० सेकंड चित्रपट अशा वर्गवारीचा समावेश होता.
प्रमुख विजेते:
•सर्वोत्कृष्ट चित्रपट – निर्जली
•सर्वोत्कृष्ट लघुपट – थुनाई
•सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्म – लेस
•सर्वोत्कृष्ट माहितीपट – दि लॉस्ट पॅराडाईज
•सर्वोत्कृष्ट ६० सेकंद चित्रपट – पालवी
वैयक्तिक पुरस्कार:
•सर्वोत्कृष्ट अभिनेता – तुषार शिंगाडे (सोंगा)
•सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – प्रियंका भेरिया (दि फर्स्ट फिल्म)
•सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – विघ्नेश परमशिवम (थुनाई)
•सर्वोत्कृष्ट पटकथा – निखिल शिंदे (डम्प यार्ड)
•सर्वोत्कृष्ट ध्वनी – सुकन्या भावळ (एक दिवस)
•सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – ऍंथोनी एन सेक
•सर्वोत्कृष्ट संपादन – दि वोको फ्रॉम हेल
विशेष पुरस्कार व नामांकने:
•ज्यूरी पुरस्कार – चित्रपट विभाग: पूवू (फुल)
•सर्वोत्कृष्ट ज्यूरी पुरस्कार: रिबेल(प्रथम) अंकुर(द्वितीय)
•विशेष नामांकने: दि फिशर, कॅनव्हास
व्हिडीओ सॉंग :
प्रथम- मेरी बहेना
द्वितीय- बार्बी बोना
तृतीय- आईज
लघुपट
प्रथम – तुनाई
द्वितीय- दि फस्ट फिल्म
तृतीय- खिचडी भात












