न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२५) :-पिंपरी चिंचवड महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांची पुणे महापालिकेत उपायुक्तपदी तर प्रशासन अधिकारी शितल वाकडे यांची पुणे महापालिकेत प्रशासन अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या वतीने एकूण २९ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी – छापवाले यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.












