न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२५) :- पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नेहरूनगर, पिंपरी न्यायालयातील पुरुष वकील कक्षामध्ये हा कार्यक्रम अॅड. अरुण खरात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ, माजी अध्यक्ष अॅड. मदन छाजेड, माजी अध्यक्ष अॅड. सुदाम साने, माजी महिला अध्यक्ष अॅड. प्रमिला गाडे, अॅड. बी. के. कांबळे, अॅड. संभाजी बवले, अॅड. सुरेश वायकर, अॅड. संभाजी वाघमारे, अॅड. नागेश गर्जे, अॅड. चांगुणा काकडे, अॅड. प्राजक्ता कदम, अॅड. तेजस चवरे, अॅड. सी. एम. माने, अॅड. राजेश रणपिसे, अॅड. तुषार खरात, अॅड. सविता तोडकर, अॅड. भाग्यश्री दिनेसन, विद्यमान अध्यक्ष अॅड. पांडुरंग शिनगारे, उपाध्यक्ष अॅड. अजय यादव, सचिव अॅड. संदीप तापकीर, महिला सचिव अॅड. संगीता कुशलकर, सहसचिव अॅड.पद्मावती पाटील, हिशोब तपासणीस अॅड. प्रेरणा चंदाणी, खजिनदार अॅड.विशाल पौळ, सदस्य. अॅड. विजय भोंडे, अॅड. अक्षय चौधरी, अॅड. सुषमा पाटील, अॅड. रुपाली पवार, अॅड. आरती कुलकर्णी, अॅड. पौर्णिमा मोहिते उपस्थित होते.
सूत्रसंचालन अॅड. तेजस चवरे यांनी केले. महिला सचिव अॅड. संगीता कुशलकर यांनी आभार मानले.












