न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२५) :- राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाकडून संकष्ट चतुर्थीनिमित्त १४ जून रोजी पिंपरी चिंचवड व शिवाजीनगर आगारातून अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बस सोडण्यात येणार आहे. नागरिकांसाठी ऑनलाइन आरक्षण सुविधा खुली करण्यात आली आहे.
शिवाजीनगर व पिंपरी आगारातून अष्टविनायक दर्शन बस शनिवारी १४ जून रोजी सकाळी सात वाजता सुटणार आहे. या बसचे प्रौढ आणि मुलांसाठी तिकीटदर वेगवेगळे असणार असून, प्रौढांसाठी १ हजार १७४ रुपये तर मुलांसाठी ५७४ रुपये असेल.
ओझर (भक्त निवास) येथे राहण्याची व जेवणाची सोय असून, तो खर्च प्रत्येक प्रवाशाने स्वतः करावयाचा आहे. अष्टविनायक दर्शनासाठी ऑनलाइन आरक्षण सुरू झाले असून, महामंडळाचे संकेतस्थळावर आणि अॅपवर आरक्षण करता येणार आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजने अंतर्गत ज्येष्ठांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत आहे. या सर्व योजनांचा लाभ प्रवाशांना अष्टविनायक दर्शनसाठी घेता येणार आहे.













![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)




