न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०४ जून २०२५) :- ‘तुम्ही आमच्या गाळ्यामधील भाडेकरूला अॅग्रीमेंट किती महीण्याचे केले आहे’ असे का विचारले, तुमचा संबंध काय आहे? असे फिर्यादीच्या वडिलांनी विचारताच तिघांपैकी आरोपी क्र. १ यांनी फिर्यादीच्या वडीलांना ‘ मी तुला जिवंत सोडणार नाही’ असे बोलुन शिवीगाळ करून त्याचे डोक्यात व कपाळावर फावड्याने मारहाण केली.
आरोपी क्र २ याने दांड्याने फिर्यादीच्या वडीलांना मारहाण करून आरोपी क्र ३ हिने फिर्यादीचे वडीलांना पाईपने मारहाण करून गंभीर जखमी करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, अस फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि.०२) रोजी रात्री ९.३० वा.चे सुमा. फिर्यादी यांचे दुकानासमोर सारासीटी, खराबवाडी, खेड येथे घडला.
अभिजीत सुनील चौगुले याने आरोपी १) सतीश मुकुंदा चौगुले वय ५७ वर्ष, २) जगदिश सतीश चौगुले वय ३८ वर्ष, ३) महिला आरोपी वय ५२ वर्ष तिघेही रा. दुर्गामाता मंदीरजवळ, खराबवाडी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी यांना अटक केली आहे.