न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जून २०२५) :- ‘कुत्र्याची घाण दारात का टाकली’? या कारणावरुन फिर्यादी वकिलाच्या वडीलांसोबत रिक्षा चालकाने भांडण केले. हातातील रिक्षाची चावी डोक्यात मारुन फिर्यादीच्या वडीलांचे डोके रिक्षावर आपटुन त्यांना गंभीर जखमी केले.
फिर्यादी वकील व फिर्यादीची भावजय हीला शीवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीचे ७१ वर्षीय वडील सर्जेराव कांबळे यांना गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुध्द होवुन त्यांना पॅरालिससचा झटका येण्यास आरोपी कारणीभुत झाला आहे, अस फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.२७/०५/२०२५) दापोडीत घडला. महिला फिर्यादी (वय ३७ वर्ष व्यवसाय वकिली) यांनी आरोपी सुधाकर शिवाजी म्हस्के (वय ४५ वर्ष धंदा-रिक्षा चालक रा. दापोडी) याच्या विरोधात फिर्याद दिली असून दापोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.