न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बीड/केज (दि. ०९ जून २०२५) :- स्वर्गीय उषाताई गोरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या वतीने बनसारोळा येथे देशी झाडांचे वृक्षारोपण गुरुवार दिनांक ५ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले आहे.
स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वृक्षारोपणाचे हे चौथे वर्ष आहे. वृक्षारोपण उपक्रमामध्ये आंबा,चिंच,जांभूळ,पेरू,फणस या फळांच्या झाडांचा व काही फुलांच्या झाडांचे रोपण करण्यात आले. तसेच ग्रामस्थांसाठी अनेक फळांच्या व फुलांच्या झाडांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतचे माजी सदस्य कृष्णा गोरे, माजी शासकीय अधिकारी व्यंकट तात्या गोरे, बीड नगरपालिका माजी आरोग्य अधिकारी व्यंकट गोरे, केज तालुका खरेदी विक्री संघाचे माजी सदस्य दिलीप गोरे, सावता परिषदेचे भारत गोरे, सावता वॉटर प्लॅन्टचे पिंटू गोरे, अनेक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत स्वर्गीय उषाताई गोरे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी केले.