- उद्यान विभाग झोपा काढतोय?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२५) :- पिंपरी कॅम्प येथील तलाठी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर असणारे झाड काही व्यावसायिकांनी अंदाजे १५-२० दिवसांपूर्वी रात्रीत तोडले आहे. काही दिवसांनी नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. झाड पूर्ण मुळासकट कटरच्या साहाय्याने काढून टाकलेलं आहे.
परिसरात ज्या दुकानाजवळ हे झाड होते. त्या झाडाचे मूळ (खोड) कापडी पोती टाकून झाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. उद्यान विभाग झोपा काढत आहे का? असा सवाल करीत अवैध वृक्षतोड कायदा नियमन १९६४ प्रमाणे दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी माझ्याशी संपर्क केला. झाड मुळा सकट काढून टाकलेलं आहे. त्याचं खोड झाकलं आहे. वृक्षतोड कायद्याप्रमाणे दोषींवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.
– सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे…