न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२५) :- राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत विशेषतः महापालिका निवडणुकीत मुंबईत एक सदस्यीय वॉर्ड, तर अन्य ठिकाणी चार सदस्यीय प्रभाग रचना असु शकते. ही प्रभाग रचना स्वीकारण्याची मानसिकता आपण ठेवली पाहिजे.
स्थानिक नेतृत्व व कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती केली जाईल, अन्यथा त्यांच्या मतानुसार निवडणुकीला सामोरे जावू असे सांगतानाच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे.
पक्षात चुकीचे वागणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. पक्षात गटातटाला थारा नाही. पक्ष एक परिवार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट २६ वा वर्धापन दिन सोहळाचा कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुण तरुणींना, महिलांना अधिकाधिक संधी दिली जाणार आहे. मुबंई महापालिकेत मध्ये एकचा तर अन्य पालिकेत चारचा असणार आहे. आता काहींचे मतप्रवाह वेगळे असतील. जसे प्रभाग ठरतील, तशी मानसिक तयारी ठेवा, सर्व समाजघटकांच्या लोकांना सभासद नोंदणीत सहभागी करून घ्या. मोठ्या जिल्ह्यांनी ५ लाखांपेक्षा जास्त सभासद नोंदणीचे लक्ष्य पूर्ण करावे. येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे , असे अजित पवार यांनी सांगितले.











