न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२५) :- दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या तरुणाला आर्मीतील हवालदार फिर्यादी हे समजावुन सांगत होते. त्यावेळी तरुणाने त्यांना ‘तुम मेरा क्या उखाड लेगा, तुझे में बाद में दिखातु हु, तुम आर पी वाले कुछ नही कर पाओगे’ असे म्हणून फिर्यादी यांच्या शासकीय गणवेशातील शर्टाचे शोल्डर धरुन फाडुन टाकले.
अंगावर धावुन जात शासकीय कर्तव्य पार पाडीत असताना कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला, अस फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि.०८) रोजी रात्री १०.४५ वा. सीएमई फोर्स, दापोडी येथे घडला.
फिर्यादी उत्तमकुमार कन्हैया सिंह (वय ३८ वर्ष, आर्मी हवालदार) यांनी आरोपी अर्जुसिंग अतरसिंग (वय २० वर्ष, रा. सीएमई फोर्स दापोडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दापोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.











