न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२५) :- चाकणमधील वराळे-वासुली गावच्या दिशेने जाणाऱ्या टाटा डंपर वाहन चालकाने त्याच्या समोरून वासुलीकडे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागुन धडक दिली. यात दुचाकीस्वार गणेश बाळु जाधव (वय २७ वर्ष, कुरकुंडी ता. खेड जि.पुणे) याच्या डोक्यास, हातास, पायास गंभिर दुखापती झाली.
त्याचा मृत्यु झाला. तसेच वाहनाचे नुकसान केले. यास डंपरचालक कारणीभुत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. १०) रोजी सकाळी ११.४५ वाजण्याचे सुमारास भांबोली गावचे हद्दीत, हॉटेल मोनिका समोर, चाकण ते वांद्रा जाणारे रोडवर घडला.
फिर्यादी गोरक्षनाथ काळुराम घावटे (वय ३० वर्ष, रा. भांबोली) यांनी आरोपी कानिफराव दिगंबर बोंबले (वय ३४ वर्ष, मुळगाव जावराला ता.उमरखेड, जि.यवतामळ सध्या रा. आंबेठाण) याच्या विरोधात फिर्याद दिली असून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.











