- महिंद्रा स्कॉर्पिओची तोडफड; ऑफिसच्या कामगारांना दमदाटी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२५) :- बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून “तुझा मालक माझेकडे, व्यंकटेश भोसले व अनिकेतकडे बघत नाही, आम्हाला खाऊ पिऊ घालत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा” असे म्हणुन ऑफिस समोर पार्क केलेली महिंद्रा स्कॉर्पिओची सिमेंटच्या ब्लॉकने तोडफोड केली. ऑफिसच्या कामगारांना दमदाटी केली.
टेबलच्या ड्रॉवरमधे व खिशामधे बळजबरीने हात घालुन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. ‘तुझ्याकडे बघुन घेतो, तुला जिवंत ठेवत नाही’ म्हणत ऑफिसचे बाहेर येवुन थोड्या अंतरावर थांबलेल्या आरोपी क्रं २ कडे गेले. ‘आम्ही या ठिकाणचे भाई आहोत. तुला व तुझ्या घरातील लोकांना जिवंत सोडणार नाही’ असे म्हणुन परिसरात जोर जोराने आरडा ओरडा करुन हातवारे केले. परिसरातील लोक त्यांच्या दहशतीला घाबरुन आपआपल्या घरात दरवाजा लावुन बसले, अस फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ०६ ते दि. ०८) शिवदत्तनगर, गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव येथे घडला. मनिष गोविंद राठी (वय ४३ वर्षे, बांधकाम व्यवसाय) यांनी आरोपी १) व्यंकटेश राजेद्र भोसले, २) विघ्नेश गुणशिलन रंगम (वय २३ वर्षे रा. गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव), ३) अनिकेत उरणकर उर्फ उन्ऱ्या यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी क्रं २ याला अटक केली आहे.


















