न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑनलाईन सेवा शुक्रवारी (दि. १३) ते रविवार (दि. १५) या दरम्यान बंद राहणार आहेत. या कालावधीत संगणक प्रणालींची तांत्रिक देखभाल दुरूस्ती करण्यात येणार आहे.
दरम्यान सोमवार (दि. १६) सकाळी ६.०० वाजेनंतर या सेवा पूर्वरत सुरु होतील, अशी माहिती मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.











