न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २३ मे २०१९) :- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी विजयाची हॅटट्रीक साधली. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा त्यांनी दिड लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.
सुप्रिया सुळे यांना ६,८३,३५२ मते तर भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना ५,२८,३२९ मते मिळाली आहेत. बारामती मतदारसंघातील दौंड आणि खडकवासला या दोनच विधानसभा मतदारसंघात सुळे यांना कमी मतदान झाले. याउलट बारामतीसह भोर, पुरंदर आणि इंदापूर या तीन तालुक्यात सुळे यांना मोठे लिड मिळाले. यामुळे सुप्रिया सुळे यांनी सुरवातीच्या फेरीपासूनच आघाडी घेत वर्चस्व राखले होते.















