न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०१९) :- मावळ लोकसभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, या निवडणुकीत पार्थ पवार यांना महायुतीचे उमेदवार खा. बारणे यांच्याकडून तब्बल दोन लाखांच्या मताधिक्क्याने सपाटून मारा खावा लागला आहे.
या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत संजोग वाघेरे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. संजोग वाघेरे म्हणाले की, इतका दुर्देवी पराभव होईल, असे वाटले नाही. आजच्या निकालाने इव्हीएमबाबचा संशय अधोरेखित झाला असल्याची कबुली त्यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना दिली आहे.











