न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०१९) :- पिरगुंट-मुठा खोऱ्यातील माळेगांव (ता. मुळाशी. जि.पुणे) येथील माळेगांव गावठाण ते धनगर वाडा रस्त्याचे भूमिपूजन आमदार शरद ढमाले व शिवसेना भोर विधानसभा संपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्षे झाली तरीही आपले डोंगराळ भागात राहणारे धनगरांबांधव रस्त्यासाठी वंचित राहिलेले आहेत. त्याना खडतर पायवाटे शिवाय कोणतेही साधन नाही आणि साधारणपणे एक हजार मिटर उंचीवर दुर्गम भागात डोगंरमाथ्यावर वास्तव्यास असणारा हा धनगर समाज मूलभूत सुविधा पासुन वंचित आहे.
दैनंदिन जीवनातील गरजासाठी रोज पाच किलोमीटर पायपीट करत आहे. गावातील तरूण भा.ज.पा. मुळशी तालुका सरचिटणीस नामदेव रामभाऊ चौधरी, भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण प्रचार प्रसिद्धी प्रमुख अरूण गुंड, सुनील सदानंद मारणे, अंकुश मारणे, दत्तोबा गुंड, अरूण तुकाराम मारणे, राजेंद्र मारुती मारणे, यांनी स्वतःच्या जमिनी विनामोबदला दिल्या आहेत. कोणतेही सरकारी अनुदान नसताना लोकसहभागातून सदर रस्त्याचे काम करण्यासाठी संतोष गुंड, सुखदेव चौधरी, शिवाजी गुंड, खंडेराव मारणे, चंद्रकांत मरगळे, ज्ञानोबा गुंड, अण्णा मरगळे, नथोबा मरगळे, भगवान गायकवाड, बबनराव मरगळे, कोडिंबादादा मरगळे, तानाजी मरगळे, बापु मरगळे, दिपकशेठ मरगळे, विश्वास चौधरी, राजेंद्र चौधरी, शंकरभाऊ मरगळे, दत्ताभाऊ मरगळे, प्रा. मरगळे सर, नथोबा गुंड, दिनकर गुंड, रोहिदास गुंड प्रयत्न करत असून, आत्तापर्यंत पन्नास टक्के काम करण्यात आले आहे.
सदर भूमिपूजन प्रसंगी मुळशी पंचायत समितीचे माजी सदस्य दौलतरावजी मारणे, दत्ताभाऊ सुर्वे, भाजपा अध्यक्ष विनायकशेठ ठोंबरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कुरपे पाटील, नामदेवराव मारणे, बाळासाहेब चोरघे, श्रीहरी मारणे, अतुलशेठ शेडगे, करण चौधरी, बंटी चौधरी, बाळकृष्ण मारणे, भाजपा भोर विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष संतोष आण्णा शेलार, राहूलदादा उभे, बाळासाहेब पवार, हनुमंत गुढेकर, कु. मोहीत वाशिवले, कु. मयुर चौधरी, तसेच सीव्हील इंजिनिअर अक्षय चौधरी व सिव्हिल इंजिनियर गिरीष गुंड उपस्थित होते, अशी माहीती सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ गणपत गुंड (माळेगाव) यांनी दिली आहे.











