- जवळपास ३८ लोकं बुडाल्याची मिळतेय माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
इंदोरी वार्ताहर (दि. १५ जून २०२५) :- मावळ तालुक्यातील कुंडमळ्यात पूल कोसळल्याने ३८ पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून ६ रुग्णालयातील आयसीयूत दाखल आहेत. ही घटना रविवारी (दि. १५) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत.

कुंडमळा ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. हाच पूल कोसळला आहे. पर्यटकांची संख्या पूलावर जास्त झाल्याने हा पूल कोसळल्याच बोललं जात आहे.

अद्याप कुंड मळ्यात किती पर्यटक बुडाले आहेत. याबाबत अद्याप आकडा स्पष्ट होऊ शकला नाही. तरीही ३८ जण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, मावळ वन्यजीव रक्षक यांची टीम पोहचली आहे. बचावकार्य सुरू आहे.











