न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १५ जून २०२५) :- ‘बर्गर किंग ब्रँड’च्या फ्रेंचायजीसाठी व्यवसायिकाला वेगवेगळ्या ई-मेल व मोबाईल नंबरवरुन वारंवार सपंर्क केला. त्यासाठी रजिट्रेशन फी व इतर कारणे सांगत एकुण १२,४०,५००/- रुपये स्वीकारले.
बर्गर किंग या ब्रँडची फ्रेंचायजी न देता दिलेल्या रक्कमेचा अपहार केला. आणखीन पैश्याची मागणी करुन आर्थिक फसवणुक केली आहे. चिखली येथे हा प्रकार घडला.
अरुण शामलाल विजय (वय ४९ वर्षे, व्यवसाय बांधकाम रा. चिखली) यांनी आरोपी कपील शर्मा, विनोद जैन व अरुण मॅथ्यू व बर्गर किंग या ब्रँडचे बँकेचे खातेधारक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















