- देहुगावातील घटना; कामगारावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १५ जून २०२५) :- देहुगावातील माळीनगर येथील पारले बिस्कीट कंपनीत ८ वर्षापासून नोकरी करणाऱ्या कामगार आरोपीला मालकाने व्यवसायातील ४३,००० रुपये रोख रक्कमेबाबत विचारणा केली. त्यावर त्याने उडवा उडवीची उत्तरे दिले.
संशय बळावल्याने मालकाने दुकानदारांकडुन हिशोबाची माहीती घेतली असता त्यात एकुण १५,५०,०००/ रुपयांची आर्थिक फसवणुक झाल्याचे उघडकीस आले आहे. विचारणा केली असता ‘तुम्ही माझी तक्रार केली, तर मी माझे जिवाचे काहीतरी बरेवाईट करील व तुझे घरादाराला मोठ्या गुन्हयात अडकविन’ अशी कामगाराने मालकाला धमकी दिली, अस फिर्यादेत नमूद आहे.
फिर्यादी मनोज ओमप्रकाश अगरवाल (वय ४५ वर्षे, माळीनगर, देहूगांव) यांनी आरोपी पिंटु शिवाजी अवघडी (रा. देहुगांव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.











