न्यूज पीसीएमसी नेटवर्क
इंदोरी (दि. १६ जून २०२५) :- प्रेमसंबंधाच्या कारणावरुन वाद झाल्याने आरोपी महिलेने ओढणीने फिर्यादीच्या भावाचे हात पाय बांधले. त्याला क्रिकेट खेळण्याची बॅट डोक व हातपायवर मारुन गंभीर जखमी करीत त्याचा खून केला, असं फिर्यादीत नमुद आहे. ही घटना मावळमधील इंदोरी येथे घडली.
कमल रामदयाल मधुकर (वय-३० वर्षे रा. छत्तीसगड) असं मयत तरूणाच नाव आहे. मयताची बहीण (वय-२० वर्षे ) हीने महिला आरोपी (वय-३० वर्षे रा-इंदोरी) हीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.











