न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी निवडणुकीच्या वेळी श्रीरंग बारणे यांच्यासोबतचे सर्व मतभेद मिटवून बारणे यांना शहरातून १ लाखांहून अधिक मतांची आघाडी देण्याचा शब्द दिला होता.
त्यामुळे चिंचवड आणि पिंपरी या दोन विधानसभा मतदारसंघातून बारणे यांना आघाडी मिळाल्याने आमदार जगताप यांनी युतीधर्म पाळत दिलेला शब्द खरा केला आहे.
भाऊंच्या या कामगिरीची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. भाऊंना मंत्रिमंडळात संधी मिळालीच पाहिजे. मागे महापालिका निवडणुकीवेळीही मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला होता. आता ती वेळ आली असल्याने भाऊंचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भविष्यातील सर्व निवडणूका दोन्ही नेते एकत्र लढल्यास सगळ्यांची पळता भुई थोडी होईल, असा सूरही भाऊ समर्थकांनामधून निघायला सुरुवात झाली आहे.















