न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघ हा पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुणे जिल्ह्यातील चिंचवड, पिंपरी आणि मावळ, तर रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत आणि पनवेल या सहा विधानसभा मतदारसंघांचा मावळमध्ये समावेश होतो. मावळ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा सलग दुसऱ्यांदा विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा २ लाख १५ हजार ९१३ मतांनी पराभव केला आहे. श्रीरंग बारणे यांना ७ लाख २० हजार ६६३ मते, तर पार्थ पवार यांना ५ लाख ४ हजार ७५० मते पडली.
श्रीरंग बारणे यांना सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी मिळाली आहे. केवळ कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना १ हजार ८५० मतांची आघाडी मिळाली आहे. उर्वरित चिंचवड, पिंपरी, पनवेल, मावळ आणि उरण या पाच मतदारसंघाने बारणे यांना आघाडी दिली आहे. बारणे यांना चिंचवड आणि पिंपरी या दोन विधानसभा मतदारसंघांनी तब्बल १ लाख ३८ हजार ५२ मतांची आघाडी दिली आहे. याशिवाय बारणे यांना मावळ विधानसभा मतदारसंघातूनही २१ हजार ८२७, उरण विधानसभा मतदारसंघातून २ हजार ८८८ आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातून ५४ हजार ६५८ मतांची आघाडी मिळाली आहे.
मावळ मतदारसंघातील उमेदवारांना एकूण मिळालेली मते
संजय कानडे ( बहूजन समाज पार्टी ) :- १०१९७
जगदीश सोनवणे ( क्रांतिकारी जयहिंद सेना ) :- ५,२४२
जया पाटील (आंबेडकर राइट पार्टी ऑफ इंडिया) :- २,३२८
पंढरीनाथ पाटील (बहुजन मुक्ती पार्टी) :- २,५७०
प्रकाश महाडीक (भारतीय नवजवान सेना) :- १,०९५
मदन पाटील (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष) :- २,२४३
राजाराम पाटील (वंचित बहुजन आघाडी) :- ७५,९०४
सुनील गायकवाड (बहुजन रिपब्लिकन पार्टी) :- १७५५
अजय लोंढे (अपक्ष) :- १,०४४
अमृता आपटे (अपक्ष) :- १६९६
नवनाथ दुधाळ (अपक्ष) :- २,८०२
प्रशांत देशमुख (अपक्ष) :- ६,३१८
बाळकृष्ण घरत (अपक्ष) :- ३, ६०३
राकेश चव्हाण (अपक्ष) :- ३,२२५
राजेंद्र काटे (अपक्ष) :- १,६३९
विजय रंदिल (अपक्ष) :- २,०९३
सुरज खंदारे (अपक्ष) :- १८७३
सुरेश तौर (अपक्ष) :- १,०८३
डॉ. सोमनाथ पोळ (अपक्ष) :- ९७०
नोटा :- १५, ७७९
एकूण :- १३,६८,८७२
महायुती व महाघाडी विधानसभानिहाय आकडेवारी
पनवेल विधानसभा :- एकूण मतदान :- २, ९८, २३९
महायुती :- १ लाख ६० हजार ३८५
महाआघाडी :- १ लाख २५ हजार ७२७
कर्जत विधानसभा :- एकूण मतदान :- १, ८९,५७८
महायुती :- ८३ हजार ९९६
महाआघाडी :- ८५ हजार ८४६
उरण विधानसभा :- एकूण मतदान :- १, ९४, ८५३
महायुती :- ८९ हजार ५८७
महाआघाडी :- ८६ हजार ६९९
मावळ विधानसभा :- एकूण मतदान :- २, १०, ३२७
महायुती :- १ लाख ५२ हजार २७२
महाआघाडी :- ८३ हजार ४४५
चिंचवड विधानसभा :- एकूण मतदान :- २, ८३, ००३
महायुती :- १ लाख ७६ हजार ४७५
महाआघाडी :- ७९ हजार ७१७
पिंपरी विधानसभा :- एकूण मतदान :- १, ८९, ५०२
महायुती :- १ लाख ३ हजार २३५
महाआघाडी :- ६१ हजार ९४१















