- गुन्हेगारांच चायनीज कनेक्शन आणल उजेडात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२५) :- डिजिटल अरेस्ट, शेअर बाजार गुंतवणक, महिलेला लग्नाचे आमिष या सायबर फसवणुकीच्या ०३ गुन्हयांत एकुण ०२ कोटी ११ लाख रुपयांची सायबर फसवणुक करणा-या ११ जणांना ०५ दिवसात सिल्वासा दादरा नगर हवेली, सोलापुर, धाराशिव, अहिल्यानगर, आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे येथुन पिंपरी चिंचवड सायबर पोलीसानी अटक केली आहे.
१) बंटी रमेशभाई पांचाळ, वय ३० वर्षे, रा. अमली मंदीर फलीया, गायत्री टेम्पल समोर, सिल्वासा, दादर अॅण्ड नगर हवेली २) इंतकाफ इद्रीस खान वय ३६ वर्षे रा. सोमनाथ अपार्टमेंट, पहीला मजला, फ्लॅट नंबर ११, रोहीत फलिया, झेडा चौक, सिल्वासा. ३) सुरज कृष्णा सिंग वय ३४ वर्षे रा. फ्लॅट नं ८०३ जे.सी. टॉवर अमली, फुवारा, वापी सिल्वास मेन रोड सिल्वासा, दादरा अॅण्ड नगर हवेली, १) शुभम चंद्रकांत म्हंता वय २५ वर्षे रा. ११७०, न्यु पाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापुर २) स्वप्नील चंदुलाल बाहेती वय ३५ वर्षे रा. ६९/३. आसरा हौसिंग सोसायटी, होटगी रोड, सोलापुर. ३) प्रशिक उत्तम नवघरे वय २६ वर्षे, रा.आदर्शनगर, जुना कुंभानी नाका, सोलापुर, १) विशाल पालवे २) अक्षय सदाशिव गळवे रा. आहिल्यानगर. ३) मयुर सुनिल आनेचा रा. आहिल्यानगर अशी तिन्ही गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी यांना वेगवेगळ्या व्हॉटसअॅप नंबरव्दारे संपर्क करुन ते स्टॉक मार्केटचे एक्सपर्ट असल्याचे सांगुन त्यांचे सांगण्याप्रमाणे फिर्यादी यांना प्लॅटफॉर्मवरुन आयपीओ खरेदी केल्यास चांगला फायदा मिळवुन देण्याचे अमीष दाखवुन आयपीओ खरेदीच्या कारणासाठी त्यांनी दिलेल्या वेगवेगळया अकाऊंटला एकुण ३,३०,०००/- रु. रक्कम भरण्यास भाग पाडुन सदर रक्कमेची आर्थिक फसवणुक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्हयात फसवणुक करण्यात आलेली रक्कम ही बंधन व युको बँक अश्या दोन अकाऊंटवर घेण्यात आली होती. फिर्यादी यांची फसवणुक करण्यात आलेल्या रकमेपैकी २,१०,०००/- रु बंधन बँक शाखा सिल्वासा, दादरा अॅण्ड नगर हवेली येथिल अंकाउटवर पाठवली असल्याची माहीती मिळाली. सदरबाबत अधिक तपास करणेकरिता वरीष्ठांची परवानगी घेऊन सायबर पथक यांना सिल्वासा, दादरा अॅण्ड नगर हवेली येथे पाठविण्यात आले होते. बंधन बँक अंकाउटधारक सलमान हा मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आली होती. तसेच सदरचा गुन्हा आरोपी सलमान खान याने सुरज राठोड व बंटी पांचाळ यांच्यासह केला असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीचे शोधासाठी पुन्हा सायबर पथक दादरा सिल्वासा येथे पाठविण्यात आले होते. यावेळी आरोपी बंटी पांचाळ, सुरज सिंग व इंतकाफ खान हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले
दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी यांना अनामिका नावाचे महिलेने डेटिंग अॅपवर ओळख करुन व लग्न करण्याचे अमिष दाखवुन विश्वास संपादन केला व त्यानंतर भविष्यामध्ये घर खरेदी करण्याकरिता, ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्याकरिता वेगवेगळया अकाऊंटवर एकुण १,५५,३७,०००/- रुपये (०१ कोटी ५५ लाख रुपये) भरण्यास भाग पाडुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्हयातील कोटक बँक अंकाउटधारक अमित अशोक एकबोटे हा सोलापुर शहर परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने इसमाचा शोध घेणेकामी सायबर पथक सोलापुर शहरामध्ये रवाना करण्यात आले होते. अमित एकबोटे याचेकडे चौकशी करता त्यास आरोपी स्वप्नील बाहेती, शुभम मंथा प्रक्षित यांनी त्यास गेमिंग साठी सदरचे अंकाउटचा वापर होणार असल्याचे सांगुन सदर अंकाउट घेतले व त्यावर सायबर फसवणुकीतील पैसे पाठवण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयातील आरोपी स्वप्नील बाहेती व शुभम मंथा हे चीन या देशातील सायबर गुन्हेगार यांचेशी संर्पकात असल्याचे निष्पन्न झाले आहे. शुभम मंथा हा होलीपे नावाचे चायनीज कंपनीसोबत काम करत असल्याचे दिसुन आले आहे. आरोपी शुभम मंथा व प्रशिक हे पाटणा मार्गे नेपाळ देशात जाणेचे तयारीमध्ये असताना त्यांना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे
तिसऱ्या सायबर दाखल गुन्हयातील फिर्यादी यांची डिजिटल अरेस्टद्वारे ५२,५९,०००/- लाख रुपयांची सायबर फसवणुक करण्यात आली होती. दाखल गुन्हयामध्ये आकाश व अविनाश यांना अटक करण्यात आली होती. वरील आरोपी यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता पाहिजे आरोपी विशाल पालवे हा वेगवेगळ्या व्यक्ती यांच्याकडुन बँक अकाऊंट घेऊन त्यावर गुन्हयातील पैसे प्राप्त करीत होता. तसेच प्राप्त झालेल्या पैसे सी.डी.एम मशीनव्दारे पाठवुन स्वतःच्या क्रिप्टो वॉलेटला यु.एस.डी.टी घेत असल्याचे निष्पन्न झाले होते. दाखल गुन्हयातील आरोपी विशाल पालवे हा वेगवेगळे सिमकार्ड वापरत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यास जि. आहिल्यानगर येथे सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेऊन तपास केला असता त्याच्याकडे एकुण ०९ मोबाईल फोन, २३ विविध बँकेचे पासबुक, १८ विविध बँकेचे चेकबुक, ३५ डेबिट कार्ड, ६४०० रु रोख व एक नोटबुक असा एकुण १,१६,४००/- रु किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. तसेच आरोपी विशाल पालवे याचेकडील फसवणुकीतील रोख रक्कम स्वीकारुन त्यास युएसडीटी ही क्रिप्टोकरन्सी देणा-या आरोपी अक्षय सदाशिव गळवे व मयुर सुनिल आनेचा याचा शोध घेण्यात येवुन त्यांना ताब्यात घेतले असुन आरोपी विशाल पालवे व अक्षय सदाशिव गळवे रा. आहिल्यानगर, मयुर सुनिल आनेचा रा. आहिल्यानगर यांचा गुन्हयात सहभाग असल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयातील आरोपी हे युएसडीटी या क्रिप्टोकरन्सीचे माध्यमातुन परदेशामध्ये पैसे पाठवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आपली ओळख लपवण्यासाठी आरोपी हे डिसेट्रलाईज्ड वॉलेटचा वापर करत असल्याचे दिसुन आले आहे. सायबर फसवणुकीतील रक्कम क्रिप्टोकरन्सीद्वारे पुन्हा बाजारात आणली जात असल्याचे दिसुन आले आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पो. नि रविकिरण नाळे, सायबर पोलीस ठाणे, हे करीत आहेत.
अशा प्रकारे ०३ गुन्हयांमधील एकुण ०२ कोटी ११ लाख रुपयांची सायबर फसवणुक करणा-या ११ आरोपीना ०५ दिवसात सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांनी विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. शशीकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, सारंग आव्हाड अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संदिप डोईफोडे पोलीस उप आयुक्त गुन्हे मा. डॉ. विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनखाली पोनि रविकिरण नाळे, सपोनि प्रवीण स्वामी, पोउपनि सागर पोमण, पोउपनि वैभव पाटील, पोउपनि प्रकाश कातकाडे, मपोउपनि विदया पाटील व सायबर टिम पोलीस अंमलदार हेमंत खरात, अतुल लोखंडे, दिपक भोसले, श्रीकांत कबुले, नितेश बिच्चेवार, अमोल आरोटे, कृष्णा गवळी, स्वप्निल खणसे, प्रवीण शेळकंदे, महेश मोटकर, अभिजित उकिरडे, मोनिका चितेवार, दिपाली चव्हाण, शुभागी ढोबळे, सरीता तुपे, ज्योती साळे, वैशाली बर्गे, सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांनी दादरा नगर हवेली, सोलापुर, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातुन अथक परिश्रम घेवुन सदरचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.











