न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे यांच्याकडे समाज विकास विभागाच्या दिव्यांग कक्षासह अ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
तर, नव्याने रूजू झालेले सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्याकडे फ क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज देण्यात आले आहे. नव्याने रूजू झालेले सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्याकडे ब क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत बदल करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतेच काढले आहेत.











