न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. २० जून २०२५) :- आळंदीमध्ये रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला. या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी सध्या दुथडी भरून वाहत असून संपूर्ण घाट पाण्याखाली गेला आहे. नदीला आलेल्या पूरादरम्यान एक वारकरी वाहून गेल्याची घटना घडली.
इंद्रायणी नदीला आलेला पूर लक्षात घेता घाटावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. आळंदी येथे इंद्रायणी नदीला आलेल्या पूरात वाहून जाणाऱ्या तरुणाचे प्राण एनडीआरएफच्या टीमने वाचवले. आज सकाळी १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
इंद्रायणी नदी पात्रात एक वारकरी वाहून जात होता. त्याला पाहून इंद्रायणी नदीवरील पुलावर उभ्या राहिलेल्या वारकऱ्यांनी आरडाओरडा केला. या वारकऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी पळापळ केली. त्यांनी याबाबत एनडीआरएफच्या पथकाने सांगितले. पूरामध्ये वाहून जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी नदीत उडी मारून तरुणाचे प्राण वाचवले आहेत.