- दिंडी प्रमुखांचा सत्कार, अल्पोपहार आणि औषधांचे मोफत वितरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२५) :- ज्ञानोबा-तुकाराम या जयघोषात, रिमझीम पावसात पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचा गजर करत मार्गस्थ झालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे शहरात आगमन झाले आणि पिंपरी चिंचवड नगरी भक्तीभावात मग्न झाली.
अखंड हरिनामाच्या गजरात निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे निगडी येथे शिवतेज प्रतिष्ठान व श्री संत तुकाराम महाराज व्यापार संकुलाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. २० वर्ष झाले ही सेवा अविरत चालू आहे.
यावेळी मा. वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य सुरेश वाडकर विद्युत सनियंत्रण समिती पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर, रवींद्र चौधरी, नंदकिशोर तोवर, विजय शिनकर, सुहास पाठक, गणेश वाडकर, दिनकर चव्हाण, प्रफुल पोटफोडे, सुनील कांकरिया, ओमप्रसाद परदेशी, वाडकर, उंडे, कामठे तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिंडी प्रमुखांचा पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व वारकरी भाविकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र होमिओपॅथिक फीमेल डॉक्टर्स असोसिएशन (MHFDA – PIMPRI CHINCHWAD TEAM) च्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषधं देण्यात आली.