न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23 जून 2025) :- विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे पक्षातून बाहेर पडत शरदचंद्र पवार पक्षात गेले होते. आता त्यांनी घरवापसी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्यासह ३७ माजी नगरसेवक आणि ३४ कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत दादांचे घड्याळ हाती बांधले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
या माजी नगरसेवकांची घरवापसी…
अजित गव्हाणे, वैशाली घोडेकर, राहुल भोसले, समीर मासुळकर, गीता मंचरकर, संजय वाबळे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, रवींद्र सोनवणे, यश साने, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, सुमन पवळे, संजय नेवाळे, वसंत बोराटे, भिमाबाई फुगे, सारिका लांडगे, हनुमंत भोसले, बबन बोराटे, विश्वनाथ लांडे, तानाजी खाडे, शशिकिरण गवळी, शुभागी बोऱ्हाडे, वैशाली उबाळे, स्वाती साने, मंदा आल्हाट, शांता आल्हाट, घनश्याम खेडेकर, चंद्रकांत वाळके, जालिंदर शिंदे, विनायक रणसुभे, ईश्वर ठोंबरे, धनंजय भालेकर, निवृत्ती शिंदे, नंदू शिंदे यांचा समावेश आहे.












