न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23 जून 2025) :- चाकण एमआयडीसीतील आंबेठाण येथे टेक्नोक्राफट नामक कंपनीतील प्रोडक्शन सुपरवायझरने १,८२,८००/- रु किंमतीचे १२० एम.एस.एच.आर व यापुर्वी १००० किलो वजनाचे अंदाजे ६० एम.एस.एच.आर पंचीगचे शीटचा अप्रामाणिकपणे स्वतःच्या फायदयासाठी अपहार केला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी विठ्ठल जकाते यांनी आरोपी।प्रोडक्शन सुपरवायझर संजय श्यामलाल विश्वकर्मा (वय ३२ वर्षे रा. मध्यप्रदेश) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.












