- जुन्या पुणे- मुंबई हायवेवरील घटना; चालक अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23 जून 2025) :- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जड-अवजड वाहनांच डायव्हर्शन करीत असताना अचानक आलेल्या विटकरी रंगाच्या टेम्पोवरील चालकाने रस्त्यावरील बॅरिगेडसला तसेच शासकीय वाहनाला धडक दिली.
धडकेत शासकीय वाहनाचा धक्का लागुन मेट्रो वॉर्डन लखन यास गंभीर मार लागून पायास मुक्का मार लागला. तसेच मेट्रो वॉर्डन साहिल पवार यास खांदयाला मुक्का मार व गुडघ्यास जखम झाली. तसेच मेट्रो वॉर्डन मोहन अवचार यास पायास व हातास मुक्कामार लागला. वाहन चालकाने हेतुपुर्वक जाणीवपूर्वक त्यांना जखमी करून तसेच शासकीय वाहनाच्या पाठीमागील बाजुचे पूर्ण नुकसान केले आहे.
हा प्रकार (दि. २२) रोजी रात्री ०१.१५ वा. चे सुमारास जुन्या पुणे- मुंबई हायवेवर, पुना गेट हॉटेल समोर, निगडी येथे घडला.
नागनाथ कानगुडे (वय ४२ वर्षे, पोहवा/१३८९, नेमणुक निगडी वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड आयुक्तालय) यांनी आरोपी रोशन झगरू रॉय (वय २८ वर्षे, धंदा चालक, रा. बिहार राज्य) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत आहे.