- अनं अर्ध्यातच दौरा रद्दची आली नामुष्की…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23 जून 2025) :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींवर पुण्याच्या वाहतुक कोंडीला सामोरी जाण्याची वेळ आली आहे.
त्याच झालं असं की, शनिवार वाडा ते स्वारगेट दरम्यान प्रस्तावित असलेल्या भुयारी मार्गाच्या पाहणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याने त्यांना आपला दौराचं रद्द करावा लागला.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजता गडकरी शनिवारवाड्या जवळ येऊन प्रकल्पाची पाहणी करणार होते. मात्र, गडकरींना विमानतळावर येण्यास विलंब झाल्याने त्यांच्या पुढील दौऱ्यांनाही विलंब झाला. त्यात परिसरात वाहतूक कोंडी असताना पाऊस आणि गर्दीमुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती.
दरम्यान, नितीन गडकरी यांनाच वाहतूक कोंडीमुळे दौरा रद्द करण्याची वेळ आल्यानं याची चर्चा रंगली आहे.
याबाबत स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी सांगितलं की, ‘पोलिस आणि महापालिका प्रशासन यांच्यातील सन्मवयाअभावी ही वाहतूक कोंडी झाली. नियोजनात कमतरतेमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वाहतूक कोंडीत अडकले आणि त्यांचा दौरा रद्द करावा लागला.
तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार वाडा ते स्वारगेट या भुयारी मार्गाबाबत सकारात्मक अशी भूमिका घेतली असून ते लवकरच यावर बैठक घेतील. त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचं आश्वासन देण्यात आले आहे, असेही हेमंत रासने यांनी सांगितलं.
















