न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २४ जून २०२५) :- अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, भोसरी येथील सभागृहात (दि. २१) रोजी सकाळी साडेपाच ते साडेसात या वेळात योग महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
योग दिनानिमित्त या कार्यक्रमात भोसरी परिसरातील अनेक योग प्रशिक्षक आणि अभ्यासकांनी उत्साहाने मोठया प्रमाणावर सक्रिय सहभाग घेतला. सुरेश साळुंखे, वर्षा पारीख, पांडुरंग चव्हाण, संगीता जाधव, शोभा जगताप, उत्तम काकडे, बाळकृष्ण राऊत यांनी विविध योगासने, प्रात्यक्षिक सादर केली. या योग महोत्सवात स्थानिक नागरिकांनी योग प्रशिक्षक डॉ. नारायण हुले यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचा सराव देखील केला. नियमित योगामुळे आरोग्य विषयीचे फायदे देखील जाणून घेतले.
भोसरी येथील प्रभाग क्रमांक आठ मधील माजी नगरसेवक विलास मडिगेरी यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला. तसेच संजीव शिंदे, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे कौन्सिल मेंबर यांची कार्यक्रमात विशेष उपस्थित होती.
पतंजली योग समिती पिंपरी चिंचवड विभाग, विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान व कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिरात २५० हून अधिक अभ्यासकांनी सहभाग घेतला. यामुळे हा कार्यक्रम यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.
















