न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २४ जून २०२५) :- खोट्या नोटा बाळगणे व त्या वापरात आणणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीस ५०,००० जातमुचलक्यावर पुणे येथील सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. भागीरथ चौधरी असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या वतीने ॲड. संजय भळगट, ॲड. श्रीकांत मोटे, ॲड. प्रथमेश दौंडकर यांनी काम पाहिले त्यांना ॲड. प्रगती दिघे यांनी सहाय्य केले आहे.
या प्रकरणी आरोपीवर २९ एप्रिल २०२५ रोजी चिखली पोलीस स्टेशन येथे खोट्या नोटा बाळगणे व त्या वापरात आणणे अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपीने संबधित नोटा खोट्या आहेत हे माहिती असताना सुद्धा त्या वापरात आणल्या असा आरोप करण्यात आला होता. मात्र, आरोपीच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत न्यायालयाला सांगितले की संबधित नोटा ह्या आमच्या दुकानात अनोळखी व्यक्ती वस्तू खरेदी करते वेळी देऊन गेला आहे.
संबधित नोटा ह्या खोट्या आहेत याची आम्हाला सुद्धा कोणतीही कल्पना नव्हती, आरोपी हा दुकानात सेल्समनच काम करतो. आरोपीच्या दुकानात रोजी असंख्य लोक वस्तू खरेदी करता ये जा करत असतात. त्यामुळे त्यातील कोणीतरी या नोटा आरोपीच्या दुकानात देऊन गेला आहे. त्यामुळे या आरोपातील कोणतीच गोष्ट आरोपीने जाणीव पूर्वक केली नाही असा युक्तिवाद केला. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत सत्र न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे.